सहज जीवनाची टाकुन ही कात
नव्या विश्वाची नवी सुरुवात...
कसेही धडपडताना मात-पित्याचा अखंड सहारा
अखेर सोडत तो विश्वासू काठ
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात
होतो आम्ही अत्यंत भाग्यवान
लाभले आम्हास ते गुरुजन महान
तया ज्ञान दीपाने उजळवीत प्रकाशवाट
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात
लेक्चर्स पासून कैंटीन पर्यंतची अल्लड ती दोस्ती खरी
अगदीच जवळची ती चहाची उधारी
गोड त्या सर्व आठवणीना मारत गाठ
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात
कसा गं सहन होईल तो विरह
जेथे न स्पर्शिले कोणतेच कलह
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात
स्पर्धयुगाची नवी ही ओळख
चंदेरी वाटेत तो भ्रष्टाचाराचा काळोख
संकटांवर करुनी साऱ्या मात
नव्या विश्वाची नवी ही सुरुवात


